A Perfect way To wish happy birthay
आता यापुढे मी काय लिहिणार? इतक्या चांगल्या पद्ध्तीने वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्यावर दिवस नक्कीच आनंदात जाणार !
माझ्या घरी वाढदिवस साजरा करत नाहीत. लहानपणापासुन मी या गोष्टीसाठी आतुर होतो की कधीतरी माझा वाढदिवस साजरा होईल. मला केक कापयला मिळेल. पण १८ वर्षापर्यंत माझे वाढदिवस कोणालाही कळाले नाही. अगदी मला सुद्धा ! माझा वाढदिवस केला तो इंजिनियरिंग कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असताना माझ्या मित्रांनी केलेला आणि आता कंपनीमध्ये सहका-यांनी साजरा केलेला ! आणि या वर्षीचा वाढदिवस ह्या शुभेच्छाने कायम लक्षात राहणार. कारण अशा शुभेच्छा खुप भावनाप्रधान असतात.
भावना नुसत्या विशुद्ध्, निखळ भावना……..
Categories: Uncategorized

कोण काय काय म्हणाले